Sameer Panditrao
इस्रो आता मंगळाच्या पृष्ठभागावर थ्री-डी प्रिंट केलेली निवासस्थाने उभारण्याच्या तयारीत आहे. पुढील चार दशकांत मानवाला मंगळावर उतरविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त इस्रोने भविष्यातील महत्वाकांक्षी मोहिमांचा आराखडा जाहीर केला. या मोहिमांमध्ये मंगळ, चंद्र आणि भूस्थिर कक्षा यांचा समावेश आहे.
इस्रो १५० टन पेलोड वाहून नेऊ शकणाऱ्या नव्या प्रक्षेपकाच्या निर्मितीवर काम करत आहे. हे भारताच्या अवकाश शक्तीत ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
सध्याचे ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपक भूस्थिर कक्षेत ४ टन तर पृथ्वीनजिकच्या कक्षेत ८ टन पेलोड वाहून नेऊ शकते.
इस्रो ‘लुनार मॉड्यूल लॉन्च व्हेईकल’ (एलएमएलव्ही) विकसित करत आहे. हे प्रक्षेपक पृथ्वीनजिकच्या कक्षेत ८० टन आणि चंद्राच्या कक्षेत २७ टन पेलोड वाहून नेऊ शकेल.
एलएमएलव्ही हे तब्बल ११९ मीटर उंच असेल, जे ४० मजली इमारतीइतके आहे. २०३५ पर्यंत हे सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रगत प्रक्षेपकांच्या मदतीने मंगळ मोहिमांमध्ये गती येणार असून, पुढील काही दशकांत मानवाला मंगळावर उतरविण्याचे भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.