Sameer Amunekar
भारताचा माजी दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या केदार जाधवनं आता राजकारणात एन्ट्री केलीय.
भाजप पक्षात प्रवेश करत केदारनं आता आपल्या राजकीय इनिंगला सुरूवात केलीय.
केदार जाधवने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
क्रिकेटचं मैदान गाजवणारा केदार आता राजकारणातही जोरदार बॅटिंग करणार का? हे पाहावे लागेल.