Sameer Amunekar
व्यायामाच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग केल्याने स्नायू लवचिक राहतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो.
5-10 मिनिटे ट्रेडमिल किंवा सायकलिंग करून शरीराला गरम करा. यामुळे तुमचे हृदय आणि स्नायू व्यायामासाठी तयार होतील.
व्यायामाच्या आधी हलका आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. व्यायाम करताना पाण्याची पातळी टिकवणे खूप महत्त्वाचे आहे.
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास दुखापत होऊ शकते. त्यामुळे ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवात करा.
प्रत्येकाची ताकद, क्षमता वेगळी असते, त्यामुळं हळूहळू प्रगती करा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
शरीराला विश्रांती हवी असते. आठवड्यातून किमान १-२ दिवस रेस्ट घ्या.