Sameer Panditrao
१५ सप्टेंबर १९५९ हा भारतातील टेलिव्हिजन विश्वाचा ऐतिहासिक दिवस आहे. कारण या दिवशी पहिला टीव्ही प्रसारित झाला.
या प्रवासाची जबाबदारी होती दूरदर्शनची, ज्याला त्या काळी टेलिव्हिजन इंडिया म्हणत.
सुरुवातीला टीव्ही प्रसारण हा फक्त एक प्रयोग होता. आठवड्यात फक्त २ दिवस आणि दिवसाला केवळ १ तास कार्यक्रम दाखवले जात.
भारताच्या या प्रयोगाला यूनेस्कोने २०,००० डॉलर मदत केली, तर अमेरिकेने आवश्यक उपकरणे पुरवली. यामुळे हा चमत्कार शक्य झाला.
त्या काळातील टीव्हीचा उद्देश मनोरंजन नव्हता. शिक्षण, शेती आणि सामाजिक माहिती देणे हा मुख्य हेतू होता.
कृषी तंत्रज्ञान, पिकांचे मार्गदर्शन, सुधारित शेती पद्धती या सर्व माहितीमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली.
१९५९ मध्ये टीव्ही ब्लॅक अँड व्हाइट होता!सिग्नल कमजोर असल्याने टीव्ही पाहण्याचा आनंद फक्त काहीच लोकांपुरता मर्यादित होता.
त्या काळी देशभरात टीव्ही कमी होतेआणि प्रसारण पोहोचवणारी तंत्रज्ञान व्यवस्था आणखी कमी म्हणून टीव्ही पाहणे ही गोष्ट तेव्हा खास, दुर्मिळ आणि प्रतिष्ठेची होती.