Digital Gold: डिजिटल सोने कोणाकडून घ्यावे?

Sameer Panditrao

सेबीचा इशारा

गेल्या आठवड्यात गुंतवणूकदार चिंतीत झाले. पण हा इशारा फक्त अनियंत्रित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील सोनेखरेदीबाबत आहे, मान्यताप्राप्त ETF किंवा गोल्ड फंडावर नाही.

Digital Gold | Dainik Gomantak

डिजिटल खरेदीचे फायदे

डिजिटल सोने सराफी बाजारापेक्षा कमी दरात मिळते. भौतिक सोन्याचा कर, मेकिंग चार्ज, साठवणूक जोखीम टळते.

Digital Gold | Dainik Gomantak

डिजिटल सोने खरेदी करण्याचे मार्ग

गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ETF, विविध वेबसाइट्सवरून थेट डिजिटल सोने खरेदी यापैकी गोल्ड फंडसाठी डीमॅट खाते आवश्यक नाही.

Digital Gold | Dainik Gomantak

ETF आणि गोल्ड फंड सुरक्षित का?

हे दोन्ही पर्याय SEBI आणि AMFI च्या नियंत्रणाखाली चालतात. AMC, ब्रोकर, सब-ब्रोकर सर्व नोंदणीकृत असतात.

Digital Gold | Dainik Gomantak

धोका कुठे आहे?

अनेक संकेतस्थळे थेट ग्राहकांना डिजिटल सोने विकतात. या विक्रेत्यांवर SEBI चे कोणतेही नियंत्रण नसते.

Digital Gold | Dainik Gomantak

सरकारची भूमिका

देशाचे चलन वाचवण्यासाठी प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीपासून लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.‘सुवर्णरोखे योजना’ हीदेखील सुरक्षित डिजिटल सोन्याचाच प्रकार होता.

Digital Gold | Dainik Gomantak

कुठे गुंतवणूक सुरक्षित?

नोंदणीकृत ब्रोकरमार्फत ETF किंवा गोल्ड फंड घेणे पूर्णपणे सुरक्षित. गुंतवणुकीसाठी डिजिटल सोने हा प्रत्यक्ष सोनेखरेदीपेक्षा अधिक चांगला आणि सोयीस्कर पर्याय.

Digital Gold | Dainik Gomantak

थंडीत 'डार्क चॉकलेट' खावे की नाही?

Winter Health Guide