Sameer Amunekar
गोव्यात देशातल्या पहिल्या 'कर्व्ह केबल-स्टेड' पुलं बांधण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे.
गोवा सरकारच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, नितिन गडकरी यावेळी २५०० कोटी रुपयांच्या चार महामार्ग विस्तार प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील.
या प्रकल्पातील वरुणापुरी ते सडा जंक्शन (लूप-1) आणि रवींद्र भवन जंक्शन ते मुरगाव या बंदर जोडणीच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम करण्यात आलं. हा पुल गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो.
या पुलाच्या प्रकल्पासाठी एकूण 644 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. 14 ऑक्टोबर 2015 रोजी या कामाला सुरुवात झाली होती.
सरकारकडून बांधण्यात आलेल्या या पुलामुळे गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील वाहतूक सोपी व वेगवान होणार. पर्यटकांसाठी हा पूल एक आकर्षण ठरणार आहे.
गोव्यात बांधण्यात आलेलं हे पुल गोव्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण करेल, कारण भारतात अशा प्रकारचं पुल पहिल्यांदाच बांधण्यात आलं आहे.