Sameer Amunekar
उभं राहून पाणी पिल्यास ते त्वरित शरीरात खाली जातं, ज्यामुळे सांधेदुखी आणि अपचन होऊ शकते. शांतपणे बसून पाणी प्यायल्यास शरीर त्याचे योग्य प्रकारे शोषण करते.
एकदम खूप पाणी पिऊ नका; त्याऐवजी हळूहळू, घोट-घोट करून पाणी प्या. यामुळे पचनसंस्था उत्तम कार्य करते आणि शरीरातील पोषणशक्ती वाढते.
जेवणाच्या आधी ३० मिनिटे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. जेवताना जास्त पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे जठरातील आम्ल (digestive juices) विरळ होतात आणि पचन मंदावते. जेवणानंतर थोड्या वेळाने पाणी प्या, हे पचन सुधारण्यास मदत करते.
सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
दिवसाला किमान ८-१० ग्लास (२-३ लिटर) पाणी प्यावे. जास्त प्रमाणात घाम येत असल्यास, गरम हवामान असल्यास किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी अधिक प्यावे.
जास्त थंड पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. कोमट पाणी पचन सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स (विषारी पदार्थ) बाहेर टाकते आणि वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाणी गॅसच्या समस्येस उपयुक्त ठरते.