Sameer Panditrao
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये इंडिया न्यूझीलंड सामना चांगलाच रंगला.
भारतीय गोलंदाजानी विशेषत: स्पिनर्सनी न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातले.
रोहित शर्माने आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
रोहित, श्रेयस आणि केएल राहुलच्या फलंदाजीमुळे संघाने आवश्यक लक्ष्य गाठले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
मॅच संपल्यावर मात्र एक गमतीशीर घटना घडली माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली.
गंभीर यांचे अभिनंदन करत त्यांनी संघाचे कौतुक केले आणि गंभीर यांना भांगडा डान्स करण्याची विनंती केली आणि स्वत: डान्स करू लागले.
बरीच विनंती केल्यावर मात्र गंभीर यांनी भांगडा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्याना हसू आवरले नाही.