Manish Jadhav
वैभव सूर्यवंशीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारत 'ए' संघाने एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली आहे.
वैभव सूर्यवंशीने युएई (UAE) विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत शतक ठोकले आणि क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
वैभवने या स्पर्धेतील केवळ 3 सामन्यांमध्ये एकूण 18 गगनचुंबी षटकार लगावले, जो आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) स्पर्धेत कोणाही खेळाडूला न साधता आलेला एक मोठा विक्रम आहे.
ग्रुप स्टेजमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीचा स्ट्राइक रेट 242.16 इतका जबरदस्त राहिला आहे, जो त्याची आक्रमक फलंदाजी दर्शवतो.
वैभव सूर्यवंशीने या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या एकाच डावात आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा पराक्रम केला.
या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशी सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या युवा फलंदाजाने दाखवलेल्या फॉर्ममुळे आगामी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये आणि भविष्यात टीम इंडियासाठी तो एक मोठी आशा म्हणून उदयास आला आहे.