Manish Jadhav
बुद्धिबळाच्या खेळात भारताचे भविष्य उज्ज्वल दिसतेय. 2024 च्या अखेरीस, 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला.
आता रविवारी (9 फेब्रुवारी) बँकॉकमधील बँग फोंग फांग येथील किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या बँकॉक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 10 वर्षीय विराज सरावगीने अफलातून कामगिरी केली.
आसाममधील गुवाहाटी येथील 10 वर्षीय विराज सरावगीने बँकॉकमधील बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. कमी वयात देदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल लोक विराजवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
बँकॉक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विराजने 12 वर्षांखालील गटात रौप्य पदक पटकावले. विराजने महत्त्वाच्या सामन्यात शानदार खेळ केला. त्याने 6 फेऱ्यांमधून 5.5 गुण मिळवले.
विराजने चॅम्पियनशिपमध्ये दोन अनुभवी खेळाडू कुल्टुंगकिजसारी पूम (1502) आणि जुन्तोंगजिन प्रिन (1496) यांना पराभूत केले.
विराज सरावगी सध्या गुवाहाटी येथील रॉयल ग्लोबल स्कूलमध्ये पाचवीत शिकत आहे. बुद्धिबळातील भारताची उदयोन्मुख प्रतिभा म्हणून विराजकडे पाहिले जात आहे.