Manish Jadhav
तिरंगी मालिकेचा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंका संघात खेळला गेला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाजी करताना स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावले.
स्मृतीने या शतकासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक विशेष कामगिरी केली. फलंदाजीदरम्यान स्मृतीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात फलंदाजी करताना स्मृतीने 101 चेंडूत 116 धावा केल्या. खेळीदरम्यान तिने 15 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. यासह, स्मृती आता महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी जगातील तिसरी फलंदाज बनली.
या सामन्यात स्मृतीने 92 चेंडूत शानदार शतक झळकावले. स्मृतीचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 वे शतक आहे. यासह स्मृतीने इंग्लंडच्या टॉमी ब्यूमोंटला मागे टाकले.
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मेग लॅनिंगच्या नावावर आहे. मॅन लॅनिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 शतके केली आहेत. याशिवाय, सुझी बेट्सच्या नावावर 13 शतके आहेत. आता 11 शतकांसह, स्मृतीने या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचली.
या सामन्यात स्मृतीने श्रीलंकेचा कर्णधार चामारी अटापट्टूविरुद्ध सलग 3 चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात स्मृतीने स्ट्राईक रेट 114.85 होता.
याशिवाय, स्मृतीने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करुन संघाला मजबूत स्थितीत आणले.