Sameer Amunekar
माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीकडे प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद आहे.
२०१५ मध्ये, धोनीने पॅरा फोर्सेससोबत मूलभूत प्रशिक्षण आणि पॅराशूट जंपिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांना पॅरा रेजिमेंटमध्ये समाविष्ट करण्यात आले.
प्रादेशिक सेना ही एक सहाय्यक लष्करी संघटना आहे जी भारतीय सैन्याला मदत पुरवते.
पगाराबद्दल बोलायचे झाले तर, लेफ्टनंट कर्नल पदासाठी धोनीला १ लाख २१ हजार ते २ लाख १२ हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. त्याच्या पगाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने लष्करप्रमुखांना प्रादेशिक सैन्याच्या सदस्यांना बोलावण्याचा अधिकार दिला होता.
धोनीला आयपीएल २०२५ मध्ये खेळण्यासाठी ४ कोटी रुपये मानधन मिळाले.