Jemimah Rodrigues: जेमिमाचा आफ्रिकेविरुद्ध शतकी दणका; रचला नवा इतिहास

Manish Jadhav

भारत महिला संघ

भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिका खेळत आहे. या तिरंगी मालिकेत भारताचा सामना बुधवारी (7 मे) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झाला.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak

जेमिमा रॉड्रिग्ज

दरम्यान, या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी केली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तूफानी शतक झळकावले. तिने 89 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. जे भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही महिला फलंदाजाने केलेले तिसरे सर्वात जलद शतक आहे.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak

शानदार खेळी

जेमिमाने 101 चेंडूत 123 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 337 धावा केल्या.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak

रेकॉर्डधारी 'जेमिमा'

भारताकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. यावर्षी तिने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक पूर्ण केले. दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम हरमनप्रीत कौरने केला. आता जेमिमा 89 चेंडूत शतक झळकावणारी भारताची तिसरी सर्वात जलद महिला फलंदाज ठरली.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak

दुसरी महिला फलंदाज ठरली

तसेच, जेमिमा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी दुसरी महिला फलंदाज ठरली.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak

कामगिरी

महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी सर्वात मोठी एकदिवसीय खेळी करण्याचा रेकॉर्ड जेमिमाच्या आगोदर स्मृती मानधनाने नावावर आहे.

Jemimah Rodrigues | Dainik Gomantak
आणखी बघा