Manish Jadhav
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक विकेट घेताच रवींद्र जडेजाने मायदेशात (भारतात) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली.
जडेजाने ( 377* विकेट्स) महान फिरकीपटू हरभजन सिंह (376 विकेट्स) याला मागे टाकले आणि भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
या यादीत अनिल कुंबळे (476 बळी) पहिल्या तर रविचंद्रन अश्विन (475 बळी) दुसऱ्या स्थानावर आहेत.
दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने 1 विकेट मिळवत हा ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला. तो सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.
जडेजाने 199 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 377 विकेट्स घेऊन हरभजनच्या (199 डाव) विक्रमाशी बरोबरी केली.
अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट खेळ केला. त्याने नाबाद 104 धावांचे शानदार शतक ठोकले होते.
अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात जडेजाने ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला होता.
या कामगिरीमुळे रवींद्र जडेजाने भारतीय संघासाठी विशेषत: मायदेशातील कसोटी क्रिकेटमध्ये तो किती महत्त्वाचा आणि सातत्यपूर्ण गोलंदाज आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.