Manish Jadhav
भारत-दक्षिण आफ्रिका 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी भारताने 30 धावांनी गमावली. मालिका 1-1 ने बरोबरीत आणण्यासाठी गुवाहाटी येथील दुसरी कसोटी जिंकणे टीम इंडियासाठी अत्यावश्यक आहे.
या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दोन मोठ्या विक्रमांच्या उंबरठ्यावर आहे.
कसोटीत जडेजाने आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत 46 बळी घेतले आहेत. गुवाहाटी कसोटीत त्याला 4 बळी घेतल्यास आफ्रिकेविरुद्ध 50 किंवा अधिक विकेट्स घेणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरेल.
आफ्रिकेविरुद्ध 50+ बळी घेण्याचा हा विक्रम अनिल कुंबळे (84), जवागल श्रीनाथ (64), हरभजन सिंह (60) आणि रविचंद्रन अश्विन (57) यांनी केला आहे.
जडेजाने आतापर्यंत 88 कसोटी सामन्यांमध्ये 342 बळी घेतले आहेत. त्याला 8 बळी घेतल्यास, कसोटीत 350 बळी पूर्ण करण्याची मोठी संधी आहे.
जर जडेजाने 350 बळी पूर्ण केले, तर ही कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरेल.
गुवाहाटीमध्ये भारतीय फिरकीपटूंना चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जडेजासाठी हे दोन्ही विक्रम पूर्ण करण्याची संधी अधिक आहे.