Manish Jadhav
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असून, ती भारतात परतली आहे.
हैदराबादमधील 'वाराणसी' इव्हेंट आणि शूटिंगमधून वेळ काढत तिने गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटला.
प्रियांकाने गोव्याला तिचे आवडते पर्यटन स्थळ असल्याचे सांगितले.
गोव्याचे उत्कृष्ट आदरातिथ्य, येथील सोज्वळ लोक आणि प्रेमळ संस्कृती हा गोव्याचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू असल्याचे तिने नमूद केले.
तिने सोशल मीडियावर पोस्ट करत, "गोवा प्रत्येक बाबतीत अपवादात्मक आहे" अशा शब्दांत गोव्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
तसेच, प्रियांकाने गोव्याच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला. तिने सीफूडसह गोवन पदार्थांची चव चाखली.
केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे, तर गोव्याच्या जेवणातील प्रामाणिक चव हा अनुभव विशेष बनवणारा असल्याचे तिने सांगितले.
याशिवाय, सुट्टीदरम्यान तिने कॅरमचा खेळ खेळत खास रिलॅक्सेशनचा वेळ घालवला, ज्यामुळे तिचे 'फन-मोड व्हेकेशन' दिसून आले.