Yashasvi Jaiswal: जयस्वाल बनणार नवा 'सिक्सर किंग', लवकरच मोडणार रोहित शर्माचा रेकॉर्ड!

Manish Jadhav

कसोटी मालिकेला सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर सुरु होईल.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

यशस्वीचे लक्ष्य

युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माचा कसोटीतील 'सर्वात जलद 50 षटकार' मारण्याचा भारतीय विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात असेल.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

रोहितचा विक्रम

रोहित शर्माने 51 कसोटी डावांमध्ये 50 षटकार पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

जयस्वालला गरज

यशस्वीने आतापर्यंत 49 कसोटी डावांमध्ये 43 षटकार मारले आहेत. रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात 7 षटकार मारावे लागतील.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

धावांचा विक्रम

जयस्वाल सध्या 2428 धावांवर आहे. या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो आणखी 72 धावा करताच, कसोटी क्रिकेटमध्ये 2,500 धावा पूर्ण करु शकतो.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

उत्कृष्ट कामगिरी

जयस्वालने 26 कसोटी सामन्यांमधील 49 डावांत 51.65 च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या आहेत. यात 7 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

विश्वविक्रमापासून दोन पाऊले दूर

कसोटीत सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या (46 डाव) नावावर आहे. जयस्वाल रोहितचा विक्रम मोडल्यास, तो आफ्रिदीच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचेल.

yashasvi jaiswal and kl rahul | Dainik Gomantak

दिग्गजांच्या यादीत

यशस्वी जयस्वालची गणना सध्या 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

Kandahar Fort: यादव, बहामनी अन् मराठ्यांच्या राजवटींचं केंद्रस्थान; दुहेरी तटबंदीचा अनोखा 'मैदानी किल्ला'

आणखी बघा