Sameer Amunekar
श्रेयस अय्यरने दुबईच्या मैदानावर पुन्हा एकदा टीम इंडियासाठी तारणहार असल्याचं सिद्ध केलं. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात श्रेयसने शानदार फलंदाजी केली आणि दमदार अर्धशतक झळकावले.
श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एकूण ७५ चेंडू खेळले.
५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये अय्यरच्या बॅटमधून आलेलं हे सर्वात हळू अर्धशतक आहे. याआधी २०२२ मध्ये, श्रेयसने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ७४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस मैदानावर आला तेव्हा भारतीय संघाने फक्त २२ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल फक्त २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीवर निराशा केली.
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा किंग कोहलीही काही खास करू शकला नाही. ११ धावा काढून मॅट हेन्रीचा तो बळी ठरला.