Manish Jadhav
भारत आणि आयर्लंड महिला संघादरम्यान राजकोटच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सध्या खेळला जात आहे.
या सामन्यात स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या सलामी जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघींनी 156 धावांची शानदार भागीदारी केली.
महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाकडून केलेली ही 7वी सर्वोच्च पहिल्या विकेटसाठीची भागीदारी आहे.
मालिकेत आतापर्यंत स्मृती आणि प्रतिका शानदार फॉर्ममध्ये आहेत, ज्यामध्ये दोघींनी दुसऱ्या सामन्यात 156 धावांची सलामी भागीदारी केली. ही भारतीय महिला संघासाठीची दुसरी सर्वोच्च सलामी भागीदारी आहे.
स्मृती-प्रतिका जोडीने अंजू जैन आणि जया शर्मा यांच्या भागीदारीचा विक्रम मोडला, ज्यांनी 2004 मध्ये वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली होती.