Manish Jadhav
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे.
इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिका एकूण 5 सामन्यांची असणार आहे.
टी 20i मालिकेचं आयोजन हे 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे.
सूर्यकुमार यादव हा टी 20I संघाचा नियमित कर्णधार आहे. त्यामुळे सूर्या टी20I सीरिजमध्ये नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे.
1. पहिला सामना, बुधवार (22 जानेवारी) इडन गार्डन 2. दुसरा सामना, शनिवार (25 जानेवारी) चेन्नई 3. तिसरा सामना, मंगळवार (28 जानेवारी) राजकोट, 4 चौथा सामना, शुक्रवार (31 जानेवारी) पुणे. 5. पाचवा सामना, (रविवार 2 फेब्रुवारी) मुंबई.