Jamie Smith: स्मिथने घेतली भारतीय गोलंदाजांची शाळा, सेंच्युरी ठोकत केला रेकॉर्ड!

Manish Jadhav

जेमी स्मिथ

टीम इंडियाने बर्मिंगहॅममध्ये मोठी धावसंख्या उभारुन सामन्यावर ताबा मिळवला असं वाटलं. परंतु इंग्लंडच्या सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक असलेल्या जेमी स्मिथने यावर पाणी फेरलं.

jamie smith | Dainik Gomantak

शानदार खेळी

स्मिथने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने शानदार आणि आक्रमक खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान काही रेकॉर्डही झाले.

jamie smith | Dainik Gomantak

शतक ठोकलं

जेमी स्मिथ आता पहिल्या सत्रातच लंचपूर्वी शतक पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज बनला आहे, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.

jamie smith | Dainik Gomantak

सर्वात जलद शतक

स्मिथने अवघ्या 80 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हॅरी ब्रूकसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

jamie smith | Dainik Gomantak

बेन स्टोक्सला मागे सोडले

हॅरी ब्रूकने 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 80 चेंडूत शतकही ठोकले होते. तथापि, आता स्मिथने कर्णधार बेन स्टोक्सला मागे सोडले.

jamie smith | Dainik Gomantak

डेव्हिड वॉर्नर

दुसरीकडे, भारताविरुद्ध कसोटीत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 2012 मध्ये 69 चेंडूत शतक केले होते.

David Warner | Dainik Gomantak

एबी डिव्हिलियर्स

तसेच, 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सने भारताविरुद्ध 75 चेंडूत शतक केले होते.

AB de Villiers | Dainik Gomantak