Sameer Amunekar
भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांतील पहिला वनडे सामना 06 फेब्रुवारीला नागपूरच्या जामठा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट संघानं वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. टी-२० मालिका ४-१नं खिशात घातली.
आता ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतानं ५८ विजय मिळवले आहेत.
१०७ एकदिवसीय सामन्यांपैकी इंग्लंडनं ४४ सामने जिंकले आहेत. तर पाच सामने अनिर्णित राहिले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामने खेळवण्यात आले. या मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी खूपच खराब राहिली. आता एकदिवसीय सामन्यांमधू त्यांना पुनरागमन करण्याची संधी आहे.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभम गिल, यशस्वी जायसवाल व रवींद्र जडेजा यांचा एकदिवसीय मालिकेत समावेश आहे