Manish Jadhav
भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताचे अव्वल 5 फलंदाज (केएल राहुल, पंतसह) पूर्णपणे अपयशी ठरले. संघाने 126 धावांवर 7 विकेट्स गमावले.
23 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने एकहाती किल्ला लढवत संघाला सावरले.
जुरेलने अत्यंत कठीण परिस्थितीत 145 चेंडूंमध्ये शानदार शतक पूर्ण केले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले.
ध्रुव जुरेलने 175 चेंडूंमध्ये नाबाद 132 धावांची झुंजार खेळी केली, ज्यात त्याने 12 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले.
जुरेलने आधी कुलदीप यादवसोबत (20 धावा) 79 धावांची आणि नंतर मोहम्मद सिराजसोबत (15 धावा) 35 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करुन संघाला 255 च्या सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले.
या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म निराशाजनक राहिला; त्याला केवळ 24 धावा करता आल्या.
या शानदार शतकी कामगिरीमुळे, ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वरिष्ठ संघाच्या कसोटी मालिकेसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केली.
ध्रुव जुरेलच्या या अविस्मरणीय खेळीमुळे भारत 'ए' संघ पहिल्या डावात 255 धावा करु शकला.