गोमन्तक डिजिटल टीम
वैश्विक तापमानवाढीमुळे जगाची होरपळ होऊ लागली असून पृथ्वीचा पृष्ठभाग हा आता शुष्क पडू लागला आहे.
वनस्पती आणि प्राण्यांची जीवन जगण्याची क्षमता नष्ट होऊ लागली असल्याची धक्कादायक माहिती यूएन अहवालातून समोर आली आहे.
पृथ्वीचे होणारे वाळवंटीकरण रोखण्यासाठी नेमके कोणते उपाय आखले जावेत या चर्चेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पृथ्वीवरील अनेक देशांतील पाण्याचा साठा संपू लागला असून जंगलाचे आच्छादन कमी होऊ लागल्याने ही परिस्थिती ओढवली आहे
वैश्विक तापमानवाढीने पाच अब्ज लोकांना फटका बसू शकतो. युरोप, पश्चिम अमेरिका, ब्राझील, पूर्व आशिया आणि मध्यवर्ती आफ्रिकेमध्ये याची तीव्रता अधिक असणार आहे.
जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्येला त्याचा फटका बसू शकतो असा इशारा या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
सर्वांत मोठा फटका शेती क्षेत्राला बसू शकतो. जगाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होणार होउन अनेक देशांत आर्थिक सुधारणांना खीळ बसेल.