Sameer Amunekar
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. काही विशिष्ट अन्नपदार्थ मेंदूच्या आरोग्यास मदत करत असतात आणि स्मरणशक्ती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावतात.
हिरव्या पालेभाज्या या फोलेट, लोह, व्हिटॅमिन ई आणि के यांचे उत्तम स्रोत आहेत. या पोषक घटकांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि स्मरणशक्ती सुधारते.
अंड्यांमध्ये कोलीन नावाचं महत्वाचं पोषकतत्त्व आढळतं, जे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
आहारात ड्राय फ्रूट्सचा समावेश करणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
चहा आणि कॉफीचे सेवन तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरू शकते. विशेषत: कॉफीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मेंदूच्या कार्यक्षमता वाढवते.
हळदमधील कर्क्यूमिन मेंदूला नैसर्गिक संरक्षण प्रदान करतं आणि स्मरणशक्ती सुधारण्यात मदत करते. तसेच, हे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यक्षमतेला चालना देऊन मानसिक कार्यक्षमता वाढवते.