Pranali Kodre
इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असून 25 जानेवारी 2024 पासून भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
दरम्यान, इंग्लंड यंदा 12 वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.
12 वर्षांपूर्वी इंग्लंडने भारताला भारतीय भूमीतच 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले होते. विशेष म्हणजे भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका पराभूत होण्याची ती अखेरची वेळ होती.
त्यानंतर गेली 12 वर्षे भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका पराभूत झालेला नाही. त्याचमुळे हीच अपराजीत राहण्याची मालिका काय राखण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
12 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्लंडने भारताचा दौरा केलेला, तेव्हा 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती.
या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादला भारताने 9 विकेट्सने जिंकला होता, या सामन्यात नाबाद 206 आणि नाबाद 41 धावा करणारा चेतेश्वर पुजारा सामनावीर ठरला होता.
त्यानंतर मुंबई कसोटी इंग्लंडने 10 विकेट्सने जिंकली होती. या सामन्यात 186 धावा करणारा केविन पीटरसन सामनावीर ठरला होता.
कोलकाता कसोटीत इंग्लंडने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात 190 धावांची खेळी करणारा ऍलिस्टर कूक सामनावीर ठरला होता.
अखेरचा कसोटी सामना नागपूरला झालेला, जो अनिर्णित राहिला होता. या सामन्यात 4 विकेट्स घेणारा जेम्स अँडरसन सामनावीर ठरला होता.
या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार ऍलिस्टर कूकने जिंकला होता. त्याने 4 सामन्यांत 3 शतकांसह 80 च्या सरासरीने 562 धावा ठोकल्या होत्या.