Sameer Panditrao
जगातील कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचे हुकमी अस्त्र इराणने इस्राईलसोबतच्या संघर्षात उगारले आहे.
सन २०२४ मध्ये आशियातील बाजारांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ८४ टक्के कच्चे तेल आणि ८३ टक्के द्रव स्वरूपातील नैसर्गिक वायूंची वाहतूक झाली, असे आकडेवारी सांगते.
या सामुद्रधुनीतून येणारे कच्चे तेल चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये जाते. याच मार्गाने इराक व सौदीतून भारताची तेल आयात होते.
कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रतिबॅरल होण्याची शक्यता आहे.
भारताला ४० टक्के तेल मध्य पूर्वेतून मिळते.
रशिया, अमेरिका, ब्राझील येथून कमी प्रमाणात तेलाचा पुरवठा केला जातो.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास रशियातून येणारे तेल महाग होण्याची शक्यता आहे.