Sameer Panditrao
अमेरिकेने बाँबर विमानातून ‘जीबीयू-५७/बी’ म्हणजेच, बंकर बस्टर बाँबचा वापर करत इराणच्या अणुकेंद्राचे मोठे नुकसान घडवून आणले.
विमानातून टाकल्यानंतर स्फोट होण्यापूर्वी जमीन भेदत खोलवर जाणाऱ्या बाँबला बंकर बस्टर म्हणतात.
अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावर १३ हजार ६०० किलो इतक्या प्रचंड वजनाचा ‘जीबीयू-५७/बी’ हा बंकर बस्टर बाँब टाकला.
हा बाँब जमीन दोनशे फूट खोलपर्यंत भेदत जातो आणि नंतर त्याचा स्फोट होतो.
अमेरिकेकडे असलेले ‘बीएलयू-१०९’, ‘जीबीयू-२८’ हे देखील बंकर बस्टर आहेत. मात्र, त्यांची क्षमता कमी आहे.
बाँब विमानातून सोडल्यावर लक्ष्यभेद करण्यासाठी ‘जीपीएस’चा वापर होतो. हा बाँब वेगाने लक्ष्याच्या दिशेने जातो.
बाँब योग्य खोलीपर्यंत पोहोचल्यावर संगणकीकृत फ्युजच्या साह्याने स्फोटकांचा स्फोट घडवून आणला जातो.