Sameer Panditrao
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झालेला भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग मैदानात पुन्हा संतप्त झालेला दिसून आला.
झाले असे कि युवराज सिंग आता इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये सचिन तेंडुलकरच्या कप्तानीखाली खेळत होता.
या लीगचा अंतिम सामना इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्समध्ये झाला.
टिनो बेस्ट नावाच्या बॉलर्सने तेंडुलकरला आउट केले आणि त्यानंतर तो सतत तो भारतीय फलंदाजांना काही ना काही कारणाने डिवचत राहिला.
त्याच्या कृतींना युवराजने उत्तर दिले आणि दोघे समोरासमोर येऊन एकमेकांना भिडले.
काही वावगे घडायच्या आधी कप्तान लारा, अंबाती रायडू आणि अंपायर बिली बावडन यांनी हा वाद मिटवला.
या वादात पुढे काही घडले नाही पण युवराज सिंगला रागात बघून चाहत्यांना २००७ च्या फ्लिंटॉफ बरोबरच्या वादाची आणि सहा षटकारांची आठवण आली