Creative Minds Of Tomorrow मध्ये मिळणार दिग्गजांकडून मार्गदर्शनाची संधी

Akshata Chhatre

Creative Minds Of Tomorrow

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (CMOT) या नावांतर्गत एक खास उपक्रम राबवला जाणार आहे.

निवडक चित्रपट

यामध्ये 100 निवडक चित्रपट निर्मात्यांच्या समावेश आहे आणि ते 13 विविध चित्रपट शाखांमधून असणार आहेत. 

निर्मात्यांना प्रशिक्षण

गेल्यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि उपक्रमांतर्गत एकूण 75 चित्रपट निर्मात्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.

CMOT चॅम्पियन्स

CMOT चॅम्पियन्स म्हणून ओळखले जाणारे उद्योग तज्ञ यावेळी सहभागी पाच संघांना मार्गदर्शन करणार आहेत. 

नामवंतांचा समावेश

या मार्गदर्शकांमध्ये चिदानंद नाईक, सुवर्णा दास, अक्षिता वोहरा, अखिल दामोदर लोटलीकर आणि कृष्णा दुसाने यांसारख्या नामवंतांचा समावेश आहे.

Relationships in the Age of Technology

सहभागी निर्मात्यांना "तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध (Relationships in the Age of Technology)" या थीमवर लघुपट तयार करण्याचा टास्क दिला जाणार आहे. 

पाच संघ

48 तासांत चित्रपट तयार करून दाखवणे हे या उपक्रमाचे वैशिष्ठ असेल. हा टास्क पूर्ण करण्यासाठी सहभागींना प्रत्येकी 20 सदस्यांच्या पाच संघांमध्ये विभागले जाईल.

आणखीन बघा