Akshata Chhatre
सध्या सर्वत्र लग्नांचा हंगाम सुरु झाला आहे आणि अलीकडे लग्न म्हटलं म्हणजे प्री-वेडिंग शूट आलंच.
गोवा हा अनेक पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे, किंबहुना लाडाचा आहे आणि म्हणूनच अनेकदा लोकं गोव्यात लग्नाच्या शूटसाठी येतात.
तुम्ही देखील गोव्यात प्री-वेडिंग शूट करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला कोणत्या जागांवर जाऊ नये ही ठिकाणं सांगणार आहोत.
तसं पाहायला गेलं तर गोवा हा शांत समुद्र किनारे आणि निसर्गासाठी प्रसिद्ध आहे, मात्र तरीही काही ठिकाणं अशी देखील आहेत जिथे फोटशूट न केलेलंच बरं.
सगळ्यात अगोदर कोणत्याही मंदिरांमध्ये किंवा चर्चमध्ये जाऊन फोटोशूट करण्याच्या विचारात असाल तर असं करू नका. मंदिर किंवा चर्च ही धार्मिक जागा आहे, त्यामुळे जर का फोटोशूट करणारच असाल तर रीतसर परवानगी मिळवा.
पणजी येथील फोंतेन्हास इथे जाऊन फोशूट करू नका. इथे लोकं राहतात आणि पर्यटकांच्या सततच्या वावरामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.
काहीवेळा समुद्र किनाऱ्यांवर किंवा इतर पर्यटन स्थळांवर एका ठराविक अंतरावरच्या पुढे जाण्यास मनाई असते तर अशा ठिकाणी जाऊ नका.