गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला पारंपारिक जेवणाचा आनंद घेता येईल. तसेच वेगवेळ्या प्रकारची वृक्ष पाहावयास मिळतील.
गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी तांबडी सुर्ला महादेव मंदिर आहे. त्याचे रेखीव काम येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते.
स्वच्छ पाणी आणि वैविध्यपूर्ण सागरी जीवनाचा आनंद घेण्यासाठी तसेच स्कुबा ड्रायव्हिंग करण्यासाठी ग्रॅन्ड आयलंड फेमस आहे.
शापोरा नदी ही उत्तर गोव्यातील मुख्य नदी आहे. तेथे गेलेल्या पर्यटकांना नदीकडेची नारळाची झाडे,बोट प्रवास मंत्रमुग्ध करुन टाकतो.
भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य हे गोवा राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. तेथे तुम्ही निसर्गरम्य जंगल रस्त्यांचा आनंद घेऊ शकता.