गोमन्तक डिजिटल टीम
रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला आणि तळपायांना खोबरेल तेल लावा. थंडावा मिळेल आणि झोप पटकन लागेल.
उन्हाळ्यात शरीर गरम होतं. झोपण्यापूर्वी एक ग्लास गार पाणी प्यायल्याने शरीर शांत राहते आणि चांगली झोप लागते.
पाण्यात पुदिना उकळवून त्याचा वाफारा घ्या किंवा त्याचा रस प्यावा. मेंदूला थंडावा मिळतो आणि झोप सुधारते.
गर्द, घट्ट कपड्यांमुळे शरीराची उष्णता वाढते. झोपताना हलक्या आणि सैलसर कपड्यांचा वापर करा.
रात्री झोपण्याच्या आधी आंबट पदार्थ किंवा मसालेदार जेवण टाळा. ते शरीरात उष्णता वाढवते आणि झोपण्यास अडथळा होतो.
चंदन किंवा गुलाबजल कपाळावर लावल्याने शरीर थंड राहते आणि शांत झोप लागते.
झोपण्यापूर्वी उशी आणि गादीवर थंड पाणी शिंपडा किंवा हवेतील थंडावा टिकवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.