Manish Jadhav
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक नवीन आजार उद्भवत आहेत. याशिवाय, झोपेवर देखील गंभीर परिणाम होत आहे.
अनेकांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. परंतु रात्री उशिरा झोपल्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात.
जर तुमची रोजची झोपण्याची आणि उठण्याची वेळ योग्य नसेल तर त्याचा तुमच्या पोटाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
रात्री उशीरा झोपल्याने पचनक्रिया बिघडू शकते. म्हणून, वेळेवर झोपणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
शरीराला योग्य विश्रांती न मिळाल्याने तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. योग्य वेळी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे, अन्यथा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
एखाद्या व्यक्तीने कमीत कमी 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे आणि जेव्हा योग्य झोप मिळत नाही तेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवतात.
वेळेवर जेवणे, झोपणे आणि वेळेवर उठणे खूप महत्वाचे आहे. रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी थोडे चालावे, किमान 100 पावले चालावे.
उशिरा झोपणे आणि पुरेशी झोप न घेण्याने आतड्यांमध्ये मायक्रोबायोम वाढू लागते, ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका,आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.