ICC कसोटी क्रिकेटमध्ये 2027 पासून लागू करणार नवी सिस्टिम?

Manish Jadhav

आयसीसी

आयसीसी (ICC) कसोटी क्रिकेटला अधिक इंटरेस्टिंग बनवण्याच्या तयारीत आहे, जिथे दोन डिव्हिजनमध्ये संघ विभागण्याची तयारी सुरु आहे.

Team India

मोठे संघ

दोन डिव्हिजनमध्ये विभागणी केल्यास भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारखे मोठे संघ आपापसात अधिक मालिका खेळू शकतील.

Team India

सिस्टिम

आयसीसीची ही सिस्टिम 2027 फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) नंतर लागू केली जाणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे (सीए) अध्यक्ष माइक बेयर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ECB) अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांच्याशी याबाबत बातचीत करत आहेत.

Team India

निर्णय

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेच्या विक्रमी उपस्थितीनंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Team India

काय आहे सिस्टिम?

रिपोर्टनुसार, 2027 नंतर कसोटी सामन्याची दोन डिव्हिजन विभागणी केली जाऊ शकते.

Team India

डिव्हिजन 1

ही सिस्टिम लागू झाल्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांविरुद्ध अधिक सामने खेळू शकतील. या सर्व संघांना डिव्हिजन 1 ठेवण्यात येणार आहे.

Team India

डिव्हिजन 2

याशिवाय, बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांसारख्या इतर संघांना डिव्हिजन 2 मध्ये स्थान दिले जाईल जे कसोटी क्रिकेटमध्ये तुलनेने कमकुवत मानले जातात.

Team India

बलाढ्य संघ भिडणार

बलाढ्य संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. मात्र या सिस्टिममध्ये संघांना पदोन्नती आणि बाहेर पडण्याची तरतूद असेल की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

Team India
आणखी बघा