Manish Jadhav
आयसीसीने पुन्हा एकदा नवीन क्रमवारी जाहीर केली. यावेळी क्रमवारीत किरकोळ बदल झाले आहेत. टीम इंडिया सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असली तरी बदलांचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंवरही दिसून येत आहे.
क्रमवारीत तिलक वर्माला न खेळताही फायदा झाला आहे, तर टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला फटका बसला.
ट्रॅव्हिस हेड सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत मध्ये नंबर वन खेळाडू आहे. त्याचे 856 रेटिंग गुण आहेत. त्याच्यानंतर भारताचा अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे 829 रेटिंग गुण आहेत.
दरम्यान, भारताचा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा क्रमावरीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 804 रेटिंग गुण आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरीचा इंग्लंडचा माजी कर्णधार जॉस बटलरला क्रमवारीत फायदा झाला. आता बटलर 772 च्या रेटिंग गुणासह 5 व्या क्रमांकावर पोहोचला.
त्याचवेळी, भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आता क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर घसरला. त्याचे 739 रेटिंग गुण आहेत. उर्वरित टॉप 10 च्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.