Manish Jadhav
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने क्रमवारीत मोठी झेप घेतली.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातील शानदार कामगिरीचा टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला क्रमवारीत मोठा फायदा झाला.
क्रमवारीत त्याने एकाच वेळी 15 अंकाची झेप घेतली. तो आता थेट सहाव्या स्थानी पोहोचला. गिलचे रेटिंग आता 807 वर पोहोचले आहे.
शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली.
सध्या इंग्लंडविरुद्ध गिल अनेक नवे विक्रम करत आहे. आता पुढच्या सामन्यात म्हणजेच तिसऱ्या कसोटी सामन्यात गिलच्या निशाण्यावर दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम असणार आहे.
जर गिलने थोडीशीही मेहनत केली तर तो ब्रॅडमन यांना मागे टाकून विश्वविक्रम आपल्या नावावर करु शकतो.
लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात 226 धावा करुन डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्याचा आणि नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.