Sameer Amunekar
आयसीसीने बुधवारी (26 फेब्रुवारी ) एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे.
एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत.
क्रमवारीत भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल (Shubam Gill) पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला 817 रेटिंग मिळाले आहे.
विराट कोहली यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. पण तो आता पाचव्या स्थानावर आला आहे. कोहलीला 743 रेटिंग मिळाले आहे.
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूंचा सामना करत नाबाद 100 धावा केल्या होत्या. कोहलीच्या या खेळीत 7 चौकारांचाही समावेश होता.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 757 रेटिंग मिळाले आहे.