Manish Jadhav
आयसीसीने नुकतीच ताजी क्रमवारी जाहीर केली. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल दिसून आले आहेत.
क्रमवारीत भारतीय गोलंदाजांना तगडा फायदा झाला आहे. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी एका अंकाची झेप घेतली.
भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजाला क्रमवारीत चांगला फायदा झाला. त्याने आठव्या स्थानी झेप घेतली. जडेजा व्यतिरिक्त न्यूझीलंडचा मॅट हेन्रीने देखील एका अंकाने झेप घेतली.
फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे. गिल 784 रेटिंग गुणांसह नंबर-1 वनडे फलंदाज आहे.
टॉप-10 फलंदाजांमध्ये भारताचे 3 महारथी आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर असून विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
टॉप-10 मध्ये तिसरा भारतीय श्रेयस अय्यर असून क्रमवारीत तो 8 व्या क्रमांकावर आहे.