Manish Jadhav
निसान मोटर इंडियाने आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Tekton ची घोषणा केली.
निसानची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'Tekton' 2026 मध्ये बाजारपेठेत दाखल होणार असून कंपनीकडून नावाची घोषणा आणि डिझाइनची पहिली झलक सादर करण्यात आली.
निसानच्या ‘One Car, One World’ धोरणाअंतर्गत, या एसयूव्हीचे उत्पादन रेनॉसोबत भागीदारीत चेन्नई प्लांटमध्ये केले जाईल. ही कार देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही निर्यात होईल.
ही नवीन एसयूव्ही थेट Creta च्या आकाराच्या सेगमेंटमध्ये उतरणार असून, Kia Seltos, Honda Elevate आणि Tata Nexon सारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांना तगडी टक्कर देईल.
Tekton चे डिझाइन निसानच्या लोकप्रिय आणि मोठ्या एसयूव्ही 'Patrol' पासून प्रेरित आहे. कारला बोल्ड आणि मजबूत सिल्व्हुएट (silhouette) असेल.
या एसयूव्हीच्या समोरच्या दरवाज्यांवर (Front Doors) 'डबल-सी' (Double-C) हे खास डिझाइन असेल, जे हिमालय पर्वतांच्या रचनेवरुन प्रेरित आहे.
कारला दमदार बोनेट, 'C' आकाराच्या हेडलॅम्प्स आणि मजबूत खालचा बंपर मिळेल, ज्यामुळे तिला एक जबरदस्त लूक मिळेल.
कंपनीने सध्या केवळ नाव आणि डिझाइनची दिशा स्पष्ट केली आहे. इंजिन पर्याय आणि तांत्रिक स्पेसिफिकेशन्सबद्दलचे अपडेट्स लवकरच जाहीर केले जातील.