Manish Jadhav
Hyundai Creta या लोकप्रिय एसयूव्हीने भारतीय बाजारात 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या यशस्वी वाटचालीचा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने Creta King, King Night आणि King Limited Edition असे तीन नवीन स्पेशल एडिशन लॉन्च केले.
Creta King, King Limited Edition आणि King Night हे तीन नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. या व्हेरिएंटमध्ये अनेक नवीन आणि आकर्षक एक्सटियरर (Exterior) आणि इंटिरियर (Interior) बदल करण्यात आले आहेत.
Creta च्या रेंजची सुरुवात अंदाजे 11.10 लाख (एक्स-शोरुम) पासून होते. नवीन Creta King ची किंमत इंजिन आणि गियरबॉक्सनुसार 17.88 लाख ते 20.61 लाख पर्यंत आहे. King Night आणि King Limited Edition ची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
या स्पेशल एडिशनमध्ये 18-इंचचे अलॉय व्हील, नवीन मॅट ब्लॅक पेंट आणि खास बॅजिंग (Branding) देण्यात आली आहे. आतमध्ये, ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शन, 8-वे पॉवर्ड पॅसेंजर सीट आणि कप होल्डरसह सीट-बॅक टेबल यांसारखे प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
हुंडईने ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल (टच पॅनेलसह), डॅशकॅम आणि वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स फक्त स्पेशल एडिशनमध्येच नव्हे, तर Creta N Line सह इतर अनेक व्हेरिएंटमध्येही उपलब्ध करुन दिले आहेत.
गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे स्पेशल एडिशन 1.5 पेट्रोल, 1.5 डिझेल आणि 1.5 टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहेत, जे मॅन्युअल, सीव्हीटी, ऑटोमॅटिक आणि डीसीटी (DCT) गियरबॉक्सशी जोडले आहेत.
हे नवीन व्हेरिएंट बाजारातील स्पर्धा वाढवणार आहेत. अधिक किंमत असलेल्या सेगमेंटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा उद्देश यातून दिसतो, कारण King Limited आणि Night ट्रिम्स फक्त ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह उपलब्ध आहेत.
हुंदाईने हे दाखवून दिले की, ग्राहक आता चांगल्या आणि प्रीमियम फीचर्सची अपेक्षा करतात. कंपनीने हीच गरज लक्षात घेऊन अनेक नवीन फीचर्स आपल्या इतर व्हेरिएंटमध्येही दिले आहेत.