Manish Jadhav
दुबई हे गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. पण हुली हुली दुबई तसंच आखाती देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
आज (31 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून दुबई आणि आखाती देशांत प्रचंड फेमस असणाऱ्या हुली-हुली बाबत जाणून घेणार आहोत.
हुली हुली ही एक हवाईयन ग्रील्ड चिकन डिश आहे. जी चिकनला मेस्किट फायरवर बार्बेक्यू करुन आणि गोड हुली-हुली सॉससह शिजवून तयार केली जाते.
ही डिश अमेरिकेच्या हवाई या राज्यातील आहे. तिथेच ती पहिल्यांदा तयार झाली. आज आखाती देशांतील लोक हुली हुली चिकन मोठ्या उत्साहाने खातात.
हवाईतील लोकांनी टर्न म्हणजे फिरवण्यासाठी हुली हा शब्द वापरला. ग्रीलवर चिकन फिरवून, शिजवून भाजताना त्याकाळी लोक ओरडत असायचे.