Sameer Panditrao
अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या गाजलेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.
या चित्रपटात बंटीची भूमिका सुरुवातीला हृतिक रोशनला ऑफर करण्यात आली होती.
दिग्दर्शक शाद अली यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
हृतिकनेच चित्रपटाच्या कथानकातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट सुचवला होता.
हृतिकला छोट्या शहरातील वातावरणात काम करण्याबाबत फारसा आत्मविश्वास नव्हता. त्याला अशा भूमिकेबाबत काही शंका होत्या असेही त्यांनी सांगितले.
शेवटी हृतिकने हा प्रोजेक्ट नाकारला, तरी त्याचे शेवट सुचवण्यातले योगदान महत्त्वाचे ठरले.
शेवटी अभिषेक बच्चनने हा सिनेमा केला आणि तो हिट झाला