Korean Glass Skin: कोरियन मुलींच्या सुंदरतेचं सिक्रेट! घरच्या घरी बनवा 'हा' काचेसारखा चमक मिळवण्याचा सुपरहीट फॉर्म्युला; फॉलो करा टिप्स

Manish Jadhav

ग्लास स्किन सिक्रेट!

तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोर्स बारीक होतात आणि स्किनला कोरीयन मुलींसारखी नैसर्गिक चमक मिळते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

कसे बनवायचे तांदळाचे पाणी?

उकळलेले पाणी: भात शिजवताना उरलेली पेज थंड करुन वापरा. भिजवलेले तांदूळ: तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ते पाणी वापरा. फरमेंटेड वॉटर: फरमेंटेड वॉटर 24 तास बाजूला ठेवून आंबवून वापरा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

पिंपल्स आणि डागांवर गुणकारी उपाय

तांदळाच्या पाण्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म चेहऱ्यावरील लालसरपणा, पिंपल्स आणि त्यांचे काळे डाग वेगाने कमी करण्यास मदत करतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

टॅनिंग दूर करा

उन्हाळ्यात सनबर्न किंवा टॅनिंग झाले असल्यास तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला लगेच थंडावा मिळतो आणि त्वचेचा नैसर्गिक रंग परत येतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

सुरकुत्यांवर मात

या पाण्यातील स्टार्च आणि अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेमधील 'कोलॅजन' वाढवण्यास मदत करतात. यामुळे वयाच्या चाळीशीतही त्वचा घट्ट राहते आणि सुरकुत्या येत नाहीत.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

चेहऱ्यावर कसे वापरावे?

कॉटन बॉलने: कापसाच्या साहाय्याने रोज रात्री टोनरसारखे चेहऱ्यावर लावा. स्प्रे बॉटल: तांदळाचे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरुन दिवसातून 2 वेळा फेसावर स्प्रे करा. आइस क्युब्स: तांदळाचे पाणी फ्रीझरमध्ये जमवून त्याचे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर फिरवा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

ही खबरदारी नक्की घ्या!

तांदळाचे पाणी 5 ते 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस वापरु नका. दर आठवड्याला नवीन पाणी तयार करा. त्वचा जास्त कोरडी वाटल्यास आठवड्यातून फक्त 3-4 वेळाच याचा वापर करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Gym Tips: वर्कआउटनंतर शरीर रिलॅक्स करण्याचा मास्टर प्लॅन! 'हे' 7 उपाय करतील मसल रिकव्हरी सुस्साट

आणखी बघा