Sameer Panditrao
मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतला तर व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे होतात.
अनेक लोकांच्या चेहऱ्यावर काळे किंवा भुरे डाग असतात.
1 कपामध्ये 2 चमचे मध , लिंबू एकत्र करावे. चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवावे. 20 मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा.
चेहऱ्यावर सुरुकुत्या असल्यास मधात विटामिन E ची कैप्सूल एकत्र करा. 20 मिनिट लावून आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका.
थंडीच्या मौसमात प्रत्येकाची त्वचा कोरडी होते. अश्यात जर काही थेंब मध घेऊन त्यास आपल्या चेहऱ्यावर क्रीम प्रमाणे लावावे आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवावा.
मध आरोग्याला चांगले ठेवण्याच्या सोबतच आपली सुंदरता देखील वाढवण्यासाठी मदत करतो.