Sameer Panditrao
पुरंदरचा तहानुसार राजांनी आपले 23 किल्ले व चार लाख होनांचा मुलूख बादशहाला दिला.
अंकोला, कर्नाळा, कोंढाणा (सिंहगड), कोहोज, खिरदुर्ग (सागरगड) हे किल्ले.
तसेच तुंग, नंगगड, नरदुर्ग, पळसगड, किल्ले पुरंदर, प्रबळगड - मुरंजन हे किल्ले होते.
भंडारगड, मनरंजन, मानगड, मार्गगड, माहुलीगड, रुद्रमाळ हेही किल्ले होत.
रोहिडा, लोहगड, वसंतगड, विसापूर, सोनगड इतकी यादी झाली.
राजांच्या ताब्यात बारा किल्ले आणि लाख होनांचा मुलूख राहिला.
तहातील कलमांची पुर्तता होईपर्यंत संभाजीराजे मिर्झाराजाकडे ओलीस म्हणून राहीले.