Sameer Amunekar
लहान वयातच मुलांना पिगी बँक देऊन त्यात नियमितपणे पैसे टाकायला प्रोत्साहित करा. हे त्यांना पैसे साठवण्याचे पहिले धडे देईल.
मुलाला एखादी वस्तू हवी असेल (उदा. खेळणे, पुस्तक), तर त्यासाठी पैसे साठवण्याचे लक्ष्य द्या. यामुळे त्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी संयम व बचत शिकता येते.
पैशांचे महत्त्व, खर्चाची आवश्यकता आणि बचतीचे फायदे सोप्या भाषेत समजावून सांगा. कथा किंवा उदाहरणांचा वापर केल्यास लवकर समजते.
मुलांनी पैशांचा वापर योग्य गोष्टींसाठी केल्यास त्यांचे कौतुक करा. यामुळे त्यांना जबाबदारपणाची जाणीव होते.
मुलांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम 'खिशखर्च' म्हणून द्या. त्या पैशातूनच त्यांना आवश्यक गोष्टी विकत घ्यायला सांगा. यामुळे बजेटिंगची सवय लागते.
जर मुलं ठरवलेली रक्कम साठवण्यात यशस्वी झाली, तर त्यांना छोटासं बक्षीस द्या. यामुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि बचतीची सवय टिकून राहते.