Sumit Tambekar
पावसाळ्यात केसांमध्ये कमीत कमी उत्पादनांचा वापर करा. आपले केस स्वच्छ ठेवा आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा
केस धुताना प्रत्येक वेळी कंडिशनर वापरा, पण ते टाळू आणि मुळांना लावण्याऐवजी केसांनाच लावा. यामुळे तुमचे केस गळणार नाही
केस रोज धुवा आणि स्वच्छ ठेवा. केस धुतल्यानंतर थोडे कोरडे झाल्यावर सीरम लावा. यामुळे तुमच्या केसांचा ओलावा टिकून राहील आणि केस तुटणार नाहीत
रोगप्रतिकारक शक्तीचा केसांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. तसंच अधिक फळे , भाज्या खा आणि भरपूर पाणी प्या
पावसाळ्यात केसांना कोमट तेलाने मसाज करा, कारण ते केसांना पोषण देते
पावसाळ्यात हेअर ड्रायर वापरणे सहसा टाळा. परंतु, आवश्यक असल्यास फक्त केस कोरडे करा आणि ड्रायर टाळूपासून किमान साडेपाच इंच दूर ठेवून वापरा
केसांवर केमिकलयुक्त उत्पादने वापरू नका, म्हणजेच केस सरळ आणि हायलाइट करणे टाळा
पावसाळ्यात केस ओले होणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पाण्यात, हवेत धूलिकण असतात, ज्यामुळे केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.