Summer: थंडी कमी होतेय आणि ऊन वाढतेय... या दरम्यान काय काळजी घ्याल

Manish Jadhav

1: ऋतू बदलण्याची चाहूल

हिवाळा संपत आला आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. थंड हवामानातून उष्णतेकडे होणारा हा बदल आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम करु शकतो.

Summer | Dainik Gomantak

2: भरपूर पाणी प्या

उन्हाळ्याची सुरुवात होताच शरीराला भरपूर पाणी लागते. दिवसभर पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यासारखे नैसर्गिक पेय घेण्यावर भर द्या.

Water | Dainik Gomantak

3: आहारात बदल करा

हिवाळ्यात उष्ण पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. उन्हाळा सुरू होताच हलका, पचायला सोपा आहार घ्या. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.

Fruts | Dainik Gomantak

4. सनस्क्रीन लावा

हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा उन्हाळ्यात घाम आणि ऊन यामुळे त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे हलका मॉइश्चरायझर वापरा, सनस्क्रीन लावा आणि सकाळी आणि संध्याकाळी चेहरा स्वच्छ धुवा.

Skin care | Dainik Gomantak

5: उबदार कपडे

हिवाळ्याचे उबदार कपडे बाजूला ठेवा आणि हलके, सुती व सैलसर कपडे वापरण्यास सुरुवात करा. यामुळे शरीराला हवा मिळेल आणि वातावरणामुळे होणाऱ्या घामाच्या समस्यांपासून बचाव होईल.

Cloths | Dainik Gomantak

6: व्यायाम

उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जा. शरीर थंड ठेवण्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरू शकतात.

Exercise | Dainik Gomantak

7. आरोग्याची विशेष काळजी घ्या

ऋतू बदलताना सर्दी, ताप किंवा इतर लहानसहान आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य झोप, पोषक आहार आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या.

Cold And Fever | Dainik Gomantak
आणखी बघा