Akshata Chhatre
आलं फक्त चव वाढवत नाही, तर सर्दी, खोकला, सूज, वेदना यांवरही गुणकारी आहे. पण ते सहज खराब होतं याचं काय करावं?
बाजारातून आणलेलं आलं कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसा. पाण्याने धुवू नका त्यामुळे बुरशी लवकर येते.
आलं पेपर टॉवेल किंवा वृत्तपत्रात गुंडाळा, हवाबंद पिशवीत टाका, फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे आलं 2–3 आठवडे ताजं राहतं
आलं किसा, आईस ट्रेमध्ये घालून फ्रीझ करा. गरजेप्रमाणे क्यूब वापरा याने चवही टिकते, वेळही वाचतो.
आल्याचे तुकडे मधात ठेवा. हे मिश्रण सर्दी, खोकल्यावर गुणकारीअसून 2–3 आठवडे टिकतं.
हे उपाय वापरून आलं दीर्घकाळ ताजं ठेवता येतं आणि तुमच्या स्वयंपाकाची चव कायम चविष्ट राहते.